Wednesday, October 25, 2017

नेमके

भाव डोळ्यातले बोलके नेमके
बोलती नेहमी नेमके नेमके

राग येतो जरासा मलाही सखे,
आड येती तुझे हुंदके नेमके

आज भेटायला सांग येऊ कसा ?
हाय ! संपावरी चालके नेमके ...

शासनाचा गड्या नेम नाही अता
कोण हे बेत सांगू शके नेमके ?

भाव खाते किती ही गझल नेहमी
मागते शब्दही मोजके नेमके !

भेटले लाख शत्रू दयाळू मला
लाभले मित्र हे मारके नेमके

- श्रीकांत चवरे
     नाशिक

No comments:

Post a Comment