मोजणी.....
चला वेदनांची करू मोजणी !
चला यातनांची करू मोजणी !!
चला यातनांची करू मोजणी !!
तुझ्या आठवांच्यासवे स्फुंदल्या,
अशा स्पंदनांची करू मोजणी !!
अशा स्पंदनांची करू मोजणी !!
ख-या कोणत्या आणि खोट्या किती ?
तुझ्या घोषनांची करू मोजणी !!
तुझ्या घोषनांची करू मोजणी !!
किती मुक्तले कुंभमेळ्यातुनी ?
अशा पावनांची करू मोजणी !!!
अशा पावनांची करू मोजणी !!!
उरी वार केले कटाक्षातुनी,
अशा लोचनांची करू मोजणी !!
अशा लोचनांची करू मोजणी !!
अपू-याच माझ्या उरी राहिल्या ,
जुन्या भावनांची करू मोजणी !!
जुन्या भावनांची करू मोजणी !!
:- श्रीकांत चवरे
arvindanuj.blogspot.com
arvindanuj.blogspot.com