ट्रॅफिक सिग्नलची आरती
जय देवा ट्रॅफिकच्या जय सिग्नल देवा ।
कृपादृष्टी तुमची हिरवी ठेवा ।।धृ।।
चौकाचौकात तू एक भूप ।
गर्दी भक्तांची भोवती खूप ।
भासे सुंदर उन्नत रूप ।
हिरव्या रुपाचे वाटे हुरूप ।।१।। जय देवा...
तूला पाहता वाहन थांबे ।
कंटाळवाणा वेळही लांबे ।
आधीच झाला उशीर फार ।
दर्शन हिरवे दे, हो तू उदार ।।२।। जय देवा...
मार्ग हा सारा झालाय जाम ।
लाल रंगाने अडले काम ।
पोलिसदादा मागतो दाम ।
उन्हातान्हात आलाय घाम ।।३।। जय देवा...
- श्रीकांत चवरे
नाशिक
No comments:
Post a Comment