जो नको व्यवहार तो सारा करावा लागला
जीवना राडा तुझा मज निस्तरावा लागला
आवडावा मी तुला दुनिये असा नव्हतो मुळी
त्यामुळे तर साज हा मज पांघरावा लागला
राग व्यक्तिगत मला नव्हता तुझा दुनिये कधी
पण तुझा प्रस्ताव तेव्हा ठोकरावा लागला
सोबतीने रहुनीही फायदा नव्हता तुझा
हात मज हातामधे माझा धरावा लागला
माहिती आहे तुझी केली मदत नाही कुणी
शेवटी पर्याय माझा वापरावा लागला
झाकण्यासाठी तुझा खोटेपणा दुनियेपुढे
नेहमी श्रीकांत हा खोटा ठरावा लागला
- श्रीकांत विजय चवरे
No comments:
Post a Comment