Monday, April 25, 2011

श्वासातल्या सुगंधा....

श्वासातल्या सुगंधा ओठांवरी झरू दे
या चिंबल्या सुखाने तू आज बावरू दे

देहात पाकळ्यांचा हा सांडला फुलोरा

चुंबून पापण्यांना गुल्कंद हा करू दे


कांती तुझी गुलाबी बाहूत हाय आली

हे रंग यौवनाचे स्पर्शात या भरू दे


तू लाजता उराची अल्वारता कळे ही

लाजू नको मिठी ही स्पंदातुनी ठरू दे


आता नकोस बोलू डुंबावयास आलो

हा श्वास ऐनवेळी रोखूनिया धरू दे

कवी - श्रीकांत विजय चवरे



~Arvindanuj:(250707)