प्राण ओतुनी, जीव लावुनी, उरात मंथरलेले...।
सांग कुणी जर माझ्याहुनही, प्रेम तुझ्यावर केले...।।
मनात तळमळ रात्र रात्रभर क्षणात शंभर वेळा...
असे पांघरूण देहावरती उगाच पांघरलेले...।।
देऊ तुजला कसे पुरावे किती आठवण येते
गर्दीमधल्या एकांतातुन डोळे पाझरलेले...।।
नकोस विसरू मिठीत माझ्या मधाळ कातरवेळी..
तुझा चेहरा धरून हाती क्षण ते कातरलेले...।।
:- श्रीकांत चवरे
95953 74741

No comments:
Post a Comment