पाचोळा... ( अष्टाक्षरी )
तू गं हिरवी पालवी
मी हा पिवळा पाचोळा...
तुझी श्रावणाची धार
माझा कडक उन्हाळा ...
मी हा पिवळा पाचोळा...
तुझी श्रावणाची धार
माझा कडक उन्हाळा ...
रोज भरून हे येते
माझ्या मनाचे आभाळ...
तुझी आठवण येते
तिला वेळ नाही काळ ...
माझ्या मनाचे आभाळ...
तुझी आठवण येते
तिला वेळ नाही काळ ...
ऐकू येते काहीबाही
एक काळजाची धून...
आठवणींच्या कोरड्या
लाल पाचोळ्यामधून...
एक काळजाची धून...
आठवणींच्या कोरड्या
लाल पाचोळ्यामधून...
तुझी दिलेली वेदना
होई सांजवेळी गोळा...
श्वास कासावीस होतो
जीव पाचोळा पाचोळा...
होई सांजवेळी गोळा...
श्वास कासावीस होतो
जीव पाचोळा पाचोळा...
- श्रीकांत चवरे
नाशिक
नाशिक
No comments:
Post a Comment