वेदना माझ्या खर्या मिसर्यात होत्या
राहिल्या गझला तरी कचर्यात होत्या
लागला नाही कधी तुज थांगपत्ता
केवढ्या युक्त्या तुझ्या नवर्यात होत्या
टाळले तू नेहमी होकार देणे
पण खुणा प्रेमातल्या गजर्यात होत्या
चांदण्या तू माळल्या केसात जेव्हा,
चांदण्याही या किती नखर्यात होत्या
लाजरे माझे हृदय आहे तरीही
पेटल्या इच्छा किती बुजर्यात होत्या
तू स्वतःच्या पाहिल्या नाही उणीवा
पाहिल्या, ज्या नेमक्या दुसर्यात होत्या
- श्रीकांत चवरे
नाशिक
11-10-2017
No comments:
Post a Comment