माझी वणवण संपत नाही
उदास हा क्षण संपत नाही...
प्राण माझिये संपत आला...
तरी आठवण संपत नाही..।।
सुरू जाहला जरी उन्हाळा
नयनी श्रावण संपत नाही...।।
मी केले हे हृदय मोकळे ,
तव किंतू-पण संपत नाही ...।।
हार मानली तुझ्यापुढे मी,
तुझेच भांडण संपत नाही ...।
कवी:- श्रीकांत चवरे
9595374741
shrikant chavare

No comments:
Post a Comment