Tuesday, May 5, 2015

तुझिया हृदयी मी नच आता, नयनांमधुनी कोण दिसे मग ?

तुझिया हृदयी मी नच आता,
नयनांमधुनी कोण दिसे मग ?
कोण तुझ्यास्तव झुरतो आठव,
आठव माझे नाते जिवलग !!
स्पर्श फुलांसम आठवणींचा,
आता विरहासम बस तगमग !
अवती भवती माझ्या नुसती
आता या दुःखांची लगबग !!
      कवी:- श्रीकांत चवरे
           9595374741
   arvindanuj.blogspot.com

No comments:

Post a Comment