या रडण्याला,
तळमळण्याला
किंमत नाही,नाहीच अर्थ !
जीव लावणे,
रोज दाहणे,
प्रेम दिवाणे,सारेच व्यर्थ !
श्वास एकटे
भास एकटे
आणि एकटे माझे मीपण !
या क्षितिजावर,
यावे क्षणभर
आणि एकस्वर व्हावे आपण !
जन्म जरासा,
व्याकुळलेला,
विरघळलेला तळमळलेला !
ये भेटाया,
शांत कराया,
वादळ हृदयी सळसळलेला !
कवी : - श्रीकांत चवरे
9595374741
arvindanuj.blogspot.com

No comments:
Post a Comment