मी नेहमीच होतो उपरा जगापुढे
पण चेहरा बनवला हसरा जगापुढे
अपुल्या घरात होती माझी दशा अशी
पण नेहमी मिरवला नखरा जगापुढे
नक्कीच ते तुझाही घेतील फायदा
आहेस एक तूही बकरा जगापुढे
आशेवरी जगाच्या आयुष्य संपले
आता तरी अपेक्षा विसरा जगापुढे
कुठल्या भ्रमात मित्रा राहू नकोस तू
पर्याय आपल्यागत सतरा जगापुढे
बाहेर आसवांनो येऊ नका कधी
होईल काय तुमचा निचरा जगापुढे ?
शब्दात मांडण्याची घाई किती तुला?
श्रीकांत ! वेदना ही कचरा जगापुढे
No comments:
Post a Comment