गालावरी लटांच्या , झुलती खुशाल माळा...
घेते इथे मुलांच्या , हृदयात पेट ज्वाळा...
घेते इथे मुलांच्या , हृदयात पेट ज्वाळा...
पाहू नको अशी तू , छळतो कटाक्ष राणी
ओठांवरील अन् तो, छळतोय तीळ काळा !
ओठांवरील अन् तो, छळतोय तीळ काळा !
खट्ट्याळ हासताना, ललने असे गुलाबी
कित्येक जीव घेतो , नखरेल हाय चाळा !
कित्येक जीव घेतो , नखरेल हाय चाळा !
प्रेमातले मलाही , नच येत हाय काही
घेशील का मनाची, तुझिया मनात शाळा ?
घेशील का मनाची, तुझिया मनात शाळा ?
आता उसंत नाही, क्षण एक काळजाला
तू भेट एकदाची, विरहास घाल आळा...!!
तू भेट एकदाची, विरहास घाल आळा...!!
कवी:- श्रीकांत विजय चवरे
9595374741
9595374741
No comments:
Post a Comment