Friday, April 3, 2015

शा. पो. आ. श्लोक

शापोआ वार्षिक ताळमेळ बनवताना

शा. पो. आ. श्लोक

( वृत्त :- "भुजंगप्रयात" ------)

मिळे शांत येथे जरा वेळ नाही ।
जुळे तांदळाचा तरी मेळ नाही ।।धृ।।

किती डाळ अन् हे किती तेल आहे ?
किती ग्रॅम जीरे ? किती मोहरी हे ।।
प्रमाणात येणे उगा खेळ नाही ।
मिळे शांत येथे जरा वेळ नाही।।१।।

परीपूर्ण आहार अन् कँलरी द्या ।
अनूदान अर्धे जरी हे, तरी द्या ।।
नसे राजगीरा इथे केळ नाही ।
मिळे शांत येथे जरा वेळ नाही ।।२।।

मुलांच्याहि आधी स्वतः रोज सेवा ।
नमूना असावा नि रेकाँर्ड ठेवा ।।
बरे मास्तरा लागले येळ नाही ।
मिळे शांत येथे जरा वेळ नाही ।।३।।

कवी: - श्रीकांत चवरे
9595374741

arvindanuj.blogspot.com

No comments:

Post a Comment