उजाड या हृदयाची गावे..
तुजविण आता कसे जगावे...?
चूक कुणाची दोष कुणाचा?
शोधू आता कुठे सुगावे...?
आठवणींचा दाह पोळतो,
वीरहात या किती धगावे...?
रोज दाखवी नवीन आशा..
नशिबानेही किती ठगावे...?
दगड जाहले ऊर तुझे अन् ;
कसे फत्तरी फूल उगावे...?
कवी :- श्रीकांत चवरे
९५९५३ ७४७४१
arvindanuj.blogspot.com
No comments:
Post a Comment