Friday, April 3, 2015

जसे वाटले ते तसे वागले

. गझल ---------------------

जसे वाटले ते तसे वागले ।
तरी दोष सारे मला लागले ।।

मला एकटे तू दिले सोडुनी ,
अता काम सारे तुझे भागले ।।

तिथे झोप राणी सुखाची तुला ,
इथे दोन डोळे सदा जागले ।।

उरी स्पंद माझे सखे श्वास हे ,
तुझ्या आठवांनीच वैतागले ।।

जुनी प्रीत माझी मला पाहिजे,
तुला वेगळे काय मी मागले ?

कवी : - श्रीकांत विजय चवरे
          9595374741

No comments:

Post a Comment