फुलांच्या मुखीही तुझे नाव आहे
परागातुनी हा तुझा गंध वाहे
सखे चांदराती कुठे चालली तू?
नभी चालणारा तुला चंद्र पाहे
तुला माहिती ना तुझ्या हासण्याने
कसा हा दिवाणा उरी त्रास साहे
तुझी भेट होते सखे भाग्य माझे
तुझ्या भेटण्याची सदा आस राहे
तुझ्या यौवनाची खरी आग राणी
उरी हाय माझा सदा देह दाहे
- श्रीकांत विजय चवरे
अकोला

No comments:
Post a Comment